|| श्री दत्तचरित्रसार ||

अमृतघट स्वीकारो । श्रीदत्तचरित्रसार करी ।
सर्वप्रदाय सिद्धाय प्रजापुत्रनिवसिने ।
श्री नृसिंहसरस्वत्यै सद्गुरुवे नमो नमः ।।

प्रत्येक चांगल्या कार्यामागे सतत एक प्रेरणा कार्यरत असते, त्यानुसार आमच्या आजोबांकडून (स्व. विष्णु गोपाळ नातू) श्रीदत्तचरित्रसार या सुरस ग्रंथाची निर्मिती होऊन पहिली आवृत्ती १९६८ साली प्रकाशित झाली. प्रथम आवृत्तीचे वेळी (स्व.) गोविंद विष्णु व श्रीमती गीता गोविंद नातू यांचे लेखन कार्यात खूप सहकार्य झाले.

या पूज्य ग्रंथाचे पुनःप्रकाशन श्रीदत्तजयंतीला (दि. १ डिसेंबर २००९) संपन्न झाले. पुनःप्रकाशनसमयी श्री. संजय भवाळकर, सौ. आसावरी अत्रे व श्री. निशांत वापट यांचे सहकार्य लाभले.

हा ग्रंथ सस्नेह भक्तांना इंटरनेटच्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत.

नातू आणि काळे परिवार.